Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

19 वर्षीय महिलेवर बलात्कार,आरोपींचा शोध सुरु

19-year-old woman raped
, मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (18:32 IST)
राज्याच्या पालघर जिल्ह्यात एका 19 वर्षीय आदिवासी महिलेवर कथित बलात्कार झाल्याची बातमी आहे. या प्रकरणात दोघांवर बलात्काराचा आरोप आहे. ही घटना जव्हार तालुक्यातील एका गावात घडल्याची माहिती जव्हार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. रविवारी दोन जणांनी त्या आदिवासी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या दोघांनी मुलीला शेतातील धान्य गोदामात नेले आणि तेथे त्यांनी आळीपाळीने संबंधित आदिवासी महिलेवर बलात्कार केला. या लोकांनी बलात्कारानंतर त्या महिलेला धमकावले. ही बाब कोणाला सांगितल्यास जीव गमवावा लागेल, असे या लोकांनी संबंधित महिलेला सांगितले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी 19 वर्षीय आदिवासी महिला कामावरून निघाली होती. दरम्यान, दोघांनी तिला पकडून जवळच असलेल्या धान्य गोदामात नेले आणि दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. सोबतच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. सुरुवातीला घाबरून संबंधित महिलेने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. घरच्यांनी तिला विश्वासात घेऊन तिला विचारले असता तिने घडलेले सर्व काही सांगितले. नंतर कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. 
 
दोन्ही आरोपींनी धमकी दिल्याने महिला घाबरली होती. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, महिलेने भीतीपोटी या घटनेची माहिती आधी कोणालाही दिली नाही, परंतु तिचे बदललेले हावभाव पाहून कुटुंबीयांना संशय आला. घरच्यांनी तिला याचे कारण विचारले असता महिलेने हा प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली.
 
सोमवारी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सध्या आरोपींना शोधून पकडण्याची तयारी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना लवकरच पकडण्यात येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एसटी विलिनीकरणावर निर्णय शुक्रवारी