Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत गर्भपाताच्या गोळयांच्या ओव्हरडोसमुळे गर्भवतीचा मृत्यू

abortion pills
, मंगळवार, 12 मे 2020 (12:36 IST)
मुंबईच्या मीरा रोड रहिवासी 30 वर्षीय महिलेचा गर्भपाताच्या गोळयांच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. महिलेचा मृत्यू दोन मे रोजी झाला असून शवविच्छेदन अहवाल मिळाल्यावर प्रकरण उघडकीस आलं. 
 
मृत्यू झाल्यावर पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली होती. पोस्टमार्टम रिर्पोट आल्यावर या प्रकरणी पती, सासू-सासरे आणि डॉक्टर विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पण अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
 
काश्मिरा पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापैकी दोन आरोपी वैद्यकीय प्रतिनिधी आहे. डॉक्टरने त्यांना लिहून ‍दिलेल्या गर्भपाताच्या गोळयांमुळे महिलेच्या शरीरातून मोठया प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. मृत महिलेला एक वर्षाची मुलगी असून गर्भवती राहून तिला दोन महिने झाले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फ्लॉरेन्स नाईटिंगेल : ‘लेडी विथ द लँप'