Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

बेस्टला पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरु करण्याची परवानगी

बेस्टला पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरु करण्याची परवानगी
, शनिवार, 24 ऑक्टोबर 2020 (09:51 IST)
मुंबईच्या रस्त्यांवर आता बेस्ट बस पूर्ण क्षमतेने उतरणार आहेत. बेस्ट बस पूर्ण क्षमतेने चालण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली होती. ही परवानगी आता सरकारने दिली आहे. मात्र अटी शर्तींसह ही परवानगी देण्यात आली आहे. आत्तापर्यंत मुंबईत ५० टक्के क्षमतेने बेस्ट उपक्रमाची वाहतूक सुरू होती. बसमध्ये प्रवाशांना मास्क आणि सॅनिटायझर अनिवार्य असेल. तसंच रोज बसेसचे निर्जंतुकीकरण करणेही अनिवार्य असेल.
 
दरम्यान, मुंबईतील वाहतूक व्यवस्था चांगली आणि पूर्ववत करण्यासाठी एसटीची मदत घेण्यात आली होती. आता बेस्ट बसला पूर्ण क्षमतेने वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. मुंबईतील लोकलमधून अद्याप सगळ्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यातच ५० टक्के बस वाहतूक सुरु असल्याने प्रवाशांचे हाल तसेच नोकरी करण्यासाठी घरातून बाहेर पडणाऱ्यांचे हाल होत होते. मात्र आता  मुंबईकरांना  दिलासा मिळाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उत्सव काळात मुंबई आणि मडगाव दरम्यान विशेष ट्रेन धावणार