Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उत्सव काळात मुंबई आणि मडगाव दरम्यान विशेष ट्रेन धावणार

A special train
, शनिवार, 24 ऑक्टोबर 2020 (09:50 IST)
उत्सव काळात रेल्वेने कोकणवासियांसाठी मुंबई आणि मडगाव दरम्यान विशेष ट्रेन चालविणार आहे. २४ ते ३१ ऑक्टोबर पर्यंत मडगावहून दररोज ४.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुसर्‍या दिवशी ५ वाजून ५० मिनिटांनी पोहोचणार आहे. 
 
ही उत्सव विशेष एक्सप्रेस २५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज ११ वाजून ५ मिनिटांनी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी १२ वाजून १० मिनिटांनी मडगावला पोहोचेल.
 
दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, पेडणे, थिवि आणि करमाळी या ठिकाणी ही रेल्वे थांबेल. बुकिंग विशेष शुल्कासह आधीच सुरु असून विशेष संगणकीय आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर २४ ऑक्टोबरपासून सुरू होईल.
 
केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येणार आहे. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड- १९ संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे. १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, २ द्वितीय आसन श्रेणी असी आसन व्यवस्था असणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात ७ हजार ३४७ नवे रुग्ण दाखल