ताज हॉटेलवर मध्ये दहशतवादी हल्ल्याबाबत फोनवरून बनावट माहिती देणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश सिंग नावाच्या व्यक्तीने फोन करून दक्षिण मुंबईतील ताज हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ल्याची खोटी माहिती दिली होती.
मुंबईत दहशतवादी पोहोचल्याचा खोटा दावा
मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला ही माहिती मिळाल्यानंतर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपीने फोन कॉल दरम्यान सांगितले होते की तो गाझियाबाद, दिल्ली एनसीआरचा रहिवासी आहे. मुकेश सिंग असे आपले नाव सांगताना आरोपीने दावा केला होता की, मुंबईतील ताज हॉटेलमध्ये स्फोट घडवून आणण्याच्या उद्देशाने दोन पाकिस्तानी दहशतवादी समुद्रमार्गे तेथे पोहोचले होते.
सांताक्रूझ येथून आरोपीला अटक
या प्रकरणाचा तपास केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 9 ला हा फोन सांताक्रूझ भागातून आल्याचे समजले. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हा बनावट फोन केला होता. पोलिसांनी फोन करणार्याचे नाव जगदंबा प्रसाद सिंह असून तो गोळीबार रोड येथील रहिवासी आहे.
फौजदारी कलमान्वये गुन्हा दाखल
मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला सांताक्रूझ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.