Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना व्यवस्थापन कार्यात सैन्यदलातील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा घेण्याची सूचना

Instruction to take the services of retired medical officers in the military in corona management work
, बुधवार, 28 एप्रिल 2021 (20:57 IST)
मुंबई : सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेल्या राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा कोरोना व्यवस्थापन कार्यात घेण्यात याव्या, अशी सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केली.
 
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास व सैनिक कल्याण मंडळाचे अधिकारी यांचेशी राज्यपालांनी मंगळवारी (दि. २७) दूरस्थ माध्यमातून चर्चा केली, त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना केली.
 
सैन्यदलातील अधिकाऱ्यांना समाजात सन्मान व प्रतिष्ठा आहे. त्यामुळे सैन्यदलातून निवृत्त झालेल्या वैद्यकीय तसेच बिगर वैद्यकीय अधिकारी व जवानांची देखील कोरोना विषयक कार्यात मदत घेतल्यास त्याचा राज्याला लाभच होईल असे राज्यपालांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

.राज्यांसाठी लसीचे दर केले शंभर रुपयांनी कमी ; आदर पुनावाला यांची माहिती