Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

अर्णब गोस्वामींवर कथित TRP घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

अर्णब गोस्वामींवर कथित TRP घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल
, मंगळवार, 22 जून 2021 (21:10 IST)
TRP वाढवण्यासाठी पैसे दिल्याच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक न्यूजचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे.
 

कोर्टात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात अर्णब गोस्वामी यांना 19व्या क्रमांकाचे आरोपी बनवण्यात आलंय. फसवणूक, कट रचणे आणि IPC च्या इतर कलमांतर्गत गोस्वामी यांच्याविरोधात मंगळवारी (22 जून) आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
 

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, अर्णब गोस्वामी यांच्यासोबत रिपब्लिक टीव्हीचे पाच आणि महामूव्हीच्या दोन जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. कथित TRP घोटाळ्याप्रकरणी आत्तापर्यंत 22 आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
 

मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेसनोटनुसार, रिपब्लिक टीव्हीच्या संबंधित आरोपींनी, यापुर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींसोबत, संगतमत आणि कट रचून, TRP गैरकायदेशीर मार्गाने वाढवण्यासाठी लोकांना अमिष दाखवून पैसे दिल्याचं निष्पन्न झालंय.
 

त्याचसोबत डुएल LCN च्या माध्यमातून चॅनल एकापेक्षा जास्त क्रमांकावर दाखवून TRP गैरमार्गाने वाढवल्याचा मुंबई पोलिसांचा आरोप आहे. रिपब्लिक टीव्हीच्या कथित TRP घोटाळ्याचा तपास मनसुख हिरेन हत्याप्रकरणी अटकेत असलेले सचिन वाझे करत होते.
 

कथित TRP घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांना समन्स देऊन बोलवा, असे आदेश हायकोर्टाने दिले होते.
 

TRP घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी हंसा रिसर्चच्या कर्मचाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतर हा कथित धोटाळा उघडकीस आल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी हंसाच्या कर्मचाऱ्यांनी रिपब्लिक न्यूज चॅनलला पाहण्यासाठी पैसे दिल्याचं साक्षीदारांनी मान्य केल्याची माहिती दिली होती. रिपब्लिक न्यूजसोबत फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा यांच्या मालकांनाही पोलिसांनी अटक केली होती.
 

रेटिंग्ज ही एखाद्या चॅनलच्या लोकप्रियतेचा मापदंड मानली जातात. चॅनलवरचे कार्यक्रम किती चांगले किंवा वाईट याबद्दल मतमतांतरं असू शकतात, पण त्यांची लोकप्रियता मोजण्याचं एकमेव साधन TRP आहे.
 

याच TRP च्या आधारावर जाहिरातदार आपले निर्णय घेत असतात. एखादं चॅनल किंवा एखादा कार्यक्रम जितका
 

2015 पासून BARC ही भारताची अधिकृत Audience Measurement Agency बनली. त्यापूर्वी भारतात TAM Media Research नावाची एक कंपनी हे काम करत असे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना व्हायरसचा 'डेल्टा प्लस' व्हेरियंट महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा?