Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई पोलिसांनी ड्रोन उडवण्यास बंदी घातली आहे, उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार

मुंबई पोलिसांनी ड्रोन उडवण्यास बंदी घातली आहे
, बुधवार, 14 मे 2025 (08:39 IST)
Mumbai News: ऑपरेशन सिंदूरनंतर, मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव ३ जूनपर्यंत ड्रोन उडवण्यास बंदी घातली आहे. या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
ALSO READ: मुंबईत ३ दिवसांत बॉम्बस्फोट होईल! ईमेलद्वारे मिळाली धमकी
मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षेच्या उपाययोजना लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी ३ जून पर्यंत संपूर्ण शहरात ड्रोन आणि इतर रिमोट-कंट्रोल्ड फ्लाइंग उपकरणांच्या वापरावर कडक बंदी घातली आहे. बृहन्मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी ही बंदी घालण्याचे आदेश दिले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मुंबईला ड्रोन ऑपरेशन्ससाठी 'रेड झोन' म्हणून घोषित केले आहे, ज्या अंतर्गत अनधिकृत ड्रोन उडवणे हे गंभीर उल्लंघन मानले जाते. या निर्देशाला न जुमानता, रविवारी (११ मे) मुंबईतील पवई परिसरात एका २३ वर्षीय तरुणाला ड्रोन उडवताना पकडण्यात आले. घटनेनंतर संबंधित कलमांखाली त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत ३ दिवसांत बॉम्बस्फोट होईल! ईमेलद्वारे मिळाली धमकी