Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पालिकेचे अधिकारी-कर्मचारी २४ तास ड्युटीवर

Municipal officers and employees on duty 24 hours a day Maharashtra News Mumbai News in marathi Webdunia marathi
, सोमवार, 19 जुलै 2021 (08:21 IST)
मुंबईतील जोरदार पावसाबाबत माहिती देताना महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल म्‍हणाले की, अवघ्‍या काही तासांमध्‍ये २०० मिलीमीटरपेक्षा जास्‍त पावसाची नोंद झाली आहे.या पावसात वाशीनाका परिसरातील वंजारतांडा येथे संरक्षक भिंत कोसळली. तसेच विक्रोळीतील पंचशील चाळीवर दरडीचा भाग कोसळला.या दोन प्रमुख दुर्घटनांसह अन्‍य एक घटना मिळून एकूण २७ नागरिकांचा दुर्दैवी मृत्‍यू ओढवला आहे.

या दुर्घटनांच्‍या स्‍थळी बचाव आणि मदतकार्य तातडीने करण्‍यात आले आहे. पालकमंत्री आदित्‍य ठाकरे आणि अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त श्रीमती अश्‍विनी भिडे यांच्‍यासह भेटी देवून यंत्रणांना आवश्‍यक ते निर्देश दिल्‍याचेही चहल यांनी नमूद केले.
 
उपनगरीय रेल्‍वे रुळांवर साचणाऱया पावसाच्‍या पाण्‍याच्‍या अनुषंगाने चहल म्‍हणाले की,माहूल येथील पर्जन्‍य जल उदंचन केंद्राचे बांधकाम लवकरच सुरु होणार असून हे केंद्र पूर्ण झाल्‍यानंतर कुर्ला, शीव, चुनाभट्टी इत्‍यादी परिसरातील पाणी साचण्‍याचा प्रश्‍न निकाली निघेल.
 
मुंबईत पावसामुळे होणाऱया भूस्‍खलन घटना पाहता, संभाव्‍य ठिकाणांवर महानगरपालिका प्रशासनाचे बारीक लक्ष आहे.अशा ठिकाणांवरील नागरिकांचे स्‍थलांतर व पुनर्वसन करण्‍याबाबतची कार्यवाही देखील करण्‍यात येत आहे, असेही आयुक्‍तांनी नमूद केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माझी प्रकृती ठणठणीत : पेडणेकर