Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज ठाकरे यांचा लाडका श्वान ‘जेम्स’ याचं निधन

Raj Thackeray
, मंगळवार, 29 जून 2021 (15:34 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांचा लाडका श्वान ‘जेम्स’ याचं निधन झाल आहे. राज ठाकरे यांनी आपल्या लाडक्या जेम्सला अखेरचा निरोप दिला असून यावेळी ते भावूक झाल्याचं पहायला मिळालं. राज ठाकरे यांच्यासोबत यावेळी कुटुंबीय तसंच पक्षातील नेते आणि समर्थक उपस्थित होते.
 
राज ठाकरे यांचा श्वान ‘जेम्स’चं सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास निधन झालं. जेम्स गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरेंसोबत होता. वयोमानानुसार त्याचं निधन झालं असून परळमधील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आपल्या लाडक्या जेम्सला अखेरचा निरोप देण्यासाठी राज ठाकरे स्वत: उपस्थित होते. 
 
राज ठाकरे आणि ‘जेम्स’ यांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राज ठाकरे यांच्याकडे एकूण तीन ग्रेट डेन होते. त्यापैकी बॉण्ड आणि शॉन आधी गेले. त्यानंतर आता जेम्सचं निधन झालं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रत्नागिरीत 3 बालकांना डेल्टा प्लसची लागण,तिन्ही बालकांची डेल्टाप्लसवर मात