Dharma Sangrah
✕

राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे निवडणूक लढवणार

Webdunia
गुरूवार, 19 सप्टेंबर 2024 (09:40 IST)
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यानुसार 10 ते 15 ऑक्टोबर दरम्यान निवडणुका जाहीर होऊ शकतात आणि 10 ते 15 नोव्हेंबर दरम्यान मतदान होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे 10 दिवसांचा कालावधी लागतो. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीची तयारी करीत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवू शकतो.   
 
आगामी विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी मनसेच्या अनेक नेत्यांनी केली आहे. तसेच भांडुप, माहीम मतदारसंघ त्यांच्यासाठी पात्र ठरतील, तिथून अमित सहज निवडणूक जिंकू शकतात, असे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. भाजप आणि शिंदे सेना राज यांच्या मुलाला पाठिंबा देत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अमिताचा विजयाचा मार्ग सुकर होईल. 
 
तसेच अमित ठाकरे मनसेमध्ये सक्रिय आहेत. राजगडावर सोमवारी पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, त्यात आगामी विधानसभेवर चर्चा करण्यात आली.सभेत अमित ठाकरे यांनी उत्स्फूर्तपणे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचे बोलले जाते. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नाव बदलणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नाव बदलणार? अजित पवारांचे नाव देण्याच्या चर्चेवर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण

मराठी जनतेने भाजपच्या सापळ्यात अडकू नये! छठपूजेच्या वादावरून राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा

वृंदावनचे कथाकार इंद्रदेव यांच्यावर बलात्काराचा आरोप; महाराष्ट्रातील महिलेची ठाण्यात तक्रार

Xiaomi 18 Pro Series : शाओमीचा मोठा धमाका, १७ नोव्हेंबरला ७ नवीन उत्पादने लॉन्च होणार

पुढील लेख
Show comments