Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पतीला आत्महत्येची धमकी देणे ही क्रूरता मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

court
, बुधवार, 26 मार्च 2025 (14:14 IST)
पती आणि त्याच्या कुटुंबाला आत्महत्येची धमकी देऊन तुरुंगात पाठवण्याची धमकी देणे ही क्रूरता असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. 
याचिकाकर्त्याने असा दावा केला आहे की ,लग्नानंतर पत्नीचे पालक वारंवार तिच्या सासरी येऊन हस्तक्षेप करायचे. 17 ऑक्टोबर 2010 रोजी पत्नी कोणालाही न सांगता तिच्या माहेरी गेली.
याचिकाकर्त्यांचे लग्न 15 एप्रिल 2009 रोजी झाले त्यांना एक मुलगी आहे.  17 ऑक्टोबर 2010 रोजी पत्नी कोणालाही न सांगता तिच्या माहेरी गेली.तिला 24 ऑक्टोबर रोजी आणायला पत्नीच्या माहेरी गेल्यावर त्याचा अपमान करण्यात आला. या व्यतिरिक्त महिलेने सासऱ्यांवर तिच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन केल्याचा खोटा आरोप केला आहे. पत्नी नेहमी आत्महत्या करण्याची धमकी आणि सासरच्यालोकांना तुरुंगात पाठवण्याची धमकी द्यायची.
तर पत्नीने पतीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहे. महिलेने आरोप केला आहे की तिचे सासरे दारूचे व्यसन करतात आणि तिच्यावर अत्याचार करतात. 
Edited By - Priya Dixit
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ठाण्यातील व्यावसायिकाची २२ लाख रुपयांची फसवणूक