Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाईंदर खाडी पूलावरुन तरुण-तरुणी पडले पाण्यात; मुलगा सुखरूप

Youngsters fall into water from Bhayander creek bridge; The boy is safe
, शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (21:06 IST)
वसई नायगांव आणि भाईंदर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान असलेल्या भाईंदर खाडी पूलावरुन आज दुपारच्या सुमारास एका तरुण आणि तरुणींनी खाडीत पडल्याची घटना घडली. यात पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाला वाचवण्यात यश आलं आहे. तर तरुणीचा शोध सुरु आहे. दोघे ही नातेवाईक असल्याचे समोर आले आहे.
 
नायगांव आणि भाईंदर रेल्वे स्थानकाच्या मध्ये असलेल्या भाईंदर खाडीपूलावरुन आज दोघां तरुण तरुणींनी उडी मारली आहे. दोघेही औरंगाबादचे राहणारे आहेत. तरुणाच नाव संदीप खरात तर तरुणीच नाव कोमल दणके असं आहे. दोघांच वय १९ वर्ष आहे. मुलगी सध्या उल्हास नगर येथे राहते. आज दुपारी १२ च्या सुमरास हे दोघे रेल्वे रुळावरुन नायगांव हून भाईंदरच्या दिशेने जात होते. त्यावेळी रुळाखाली तैनात असलेल्या राजेंद चव्हाण या पोलीस हवालदारांनी दोघांना टोकलं. माञ त्यांनी आपणा जवळ तिकिट काढायचे पैसे नसल्याने आपण भाईंदरला चालत जात असल्याच सांगितलं.
 
दोघांनी उडी मारल्यानंतर चव्हाण यांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने संदिपला वाचवण्यात यश मिळवलं तर कोमलचा शोध अजून लागला नाही. वसई विरार शहर महानगरापालिकेच अग्निशमन दलाच पथक, स्थानिक मच्छिमार आणि पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्येच थंडीचा कहर का?, जाणून घ्या कारण!