झारखंड मधील बंडामुंडा रेल्वे स्टेशनजवळ अचानक एक हत्तीचा कळप येऊन थांबला. या कळपामध्ये एकूण 23 हत्ती होते असे सांगण्यात आले. ज्यामुळे 10 तासांपर्यंत 16 रेल्वे वाहतूक बंद करावी लागली. काही दिवसांपूर्वी येथे मालगाडीने हत्तीच्या पिलाला धडक दिली होती. हत्तींचा हा कळप त्याच पिल्लाचा शोध घेण्यासाठी आला असावा असे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार झारखंडच्या चक्रधरपुर मध्ये रेल्वे विभागाला अचानक 16 रेल्वे गाड्या थांबवाव्या लागल्या. सोमवारी बंडामुंडा स्टेशन वरील रेल्वे ट्रॅकवर 23 हत्तीचा कळप पोहचला. रेल्वेला याबाबत मिळताच काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी तेथे 23हत्ती पहिले. याची माहिती तातडीने अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर अपघात होऊ नये म्हणून त्या मार्गावरून जाणाऱ्या 16 गाड्या थांबवण्यात आल्या.