Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ईडीचे सहाय्यक संचालक आणि एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यासह अनेकांवर एफआयआर नोंदला

Webdunia
सोमवार, 28 ऑगस्ट 2023 (22:19 IST)
केंद्रीय अन्वेषण ब्युरोने सोमवारी दिल्ली दारू घोटाळ्यातील एका आरोपीची बाजू घेण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाच्या सहाय्यक संचालक आणि इतर सहा अधिकाऱ्यांना अटक केली
 
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी सीबीआयने सोमवारी मोठी कारवाई केली. तपास एजन्सीने ईडीचे सहाय्यक संचालक पवन खत्री, एअर इंडियाचे कर्मचारी दीपक सांगवान, क्लेरिजेस हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सचे सीईओ विक्रमादित्य आणि इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हेगारी कट रचणे, सार्वजनिक सेवकाला लाच देणे, भ्रष्ट मार्गाने किंवा वैयक्तिक प्रभाव वापरून अवाजवी फायदा मिळवण्यासाठी लोकसेवकाला प्रभावित करणे या गुन्ह्याखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
 
सीबीआयने ईडीचे सहाय्यक संचालक पवन खत्री यांच्या विरोधात मद्यविक्रेते अमनदीप धल्ल याने पाच कोटी रुपयांच्या कथित पेमेंटप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. याआधी शुक्रवारी याप्रकरणी अटक करण्यात आलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना नवीन बँक खाते उघडून पगार काढण्याची परवानगी दिली होती.
 
सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणांनी सिसोदिया यांच्यावर दारू घोटाळ्यात आरोप केले आहेत. तपास यंत्रणांनी सिसोदिया यांची सर्व खाती जप्त केली आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. सिसोदिया यांनी नुकतीच वैद्यकीय आणि इतर खर्चासाठी बँक खात्यातून काही रक्कम काढण्याची परवानगी मागितली होती
 



Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments