भारतात 2019 च्या लोकसभा निवडणुकांची चाहूल स्पष्ट दिसत आहेत. निवडणुकांची तारीख अजून घोषित केलेली नाही तरी राजकीय दावे दिवसेंदिवस गती घेत आहेत.
बीबीसी न्यूजने अश्याच काही दाव्यांची तपासणी केली आणि हे वाचकांसाठी रियालिटी चेक सिरीज रूपात प्रस्तुत केलं जात आहे. 25 फेब्रुवारीपासून आठवड्यातून पाच दिवस सहा भारतीय भाषेत विशेष रिपोर्ट प्रकाशित करण्यात येईल. ही रिर्पोट इंग्रजीच्या वेबसाइटवर देखील वाचता येईल.
या तपासणीत आकड्यांच्या मदतीने राजकीय पक्षांच्या दाव्यांबद्दल सत्य वाचकांसमोर मांडण्यात येत आहे.
रियालिटी चेक प्रोजेक्ट
बीबीसी रियालिटी चेक सार्वजनिक जीवनात सक्रिय लोकं, संस्थानांचे दावे यांचा तपास घेते.
रियालिटी चेक प्रोजेक्टमध्ये बघितलं जातं की ते तथ्याच्या चाचणीवर किती खरे ठरतात आणि काय ते खोट्याच्या पायावर उभे आहेत किंवा भ्रमित करणारे आहेत.
जेमी एंगस यांनी म्हटले होते की, "या कहाण्या अश्या विषयांवर आहे ज्यावर राजकारणी पक्ष देखील एकमत नाही की लोकं अश्या विषयांवर आमच्या स्वतंत्र विचारांना प्राधान्य देतात. "
जेमी एंगस यांनी म्हटले की अश्या बातम्यांसाठी आम्हाला तयार असले पाहिजे आणि यासाठी संसाधन देखील उपलब्ध करवावे ज्याने फेक न्यूजदेखील हाताळता येईल.
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये बीबीसीच्या बियोंड फेक न्यूज सीझननंतर रियालिटी चेक सर्विसची सुरुवात होणार आहे. बियोंड फेक न्यूज सीझनमध्ये बोगस बातम्या आणि डिजीटल लिट्रेसी यावर देशभरातील शाळा आणि कॉलेजमध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या.
बीबीसीत भारतीय भाषा प्रमुख रूपा झा सांगतात की "आशा आहे की भारतात ज्या मुद्द्यांवर वाद सुरू आहे, रियालिटी चेकद्वारे आम्ही त्यांना समजून आणि निवडणुकांवेळी सूचना देण्यासाठी सर्वात विश्वसनीय स्रोत असू."
बीबीसी रियालिटी चेक सिरीजची रिर्पोट भारतीयांचे आजीविका आणि जीवनाला प्रभावित करणार्या मुद्द्यांची तपासणी करणारी असेल.
बीबीसी रियालिटी चेक सिरीजमध्ये आकड्याच्या मदतीने महागाईपासून सुरक्षा, स्वच्छता अभियानापासून ते ट्रांसपोर्ट सुविधेच्या पायाभूत सुविधांवर करण्यात आलेले राजकीय पक्षांच्या दाव्यांची चौकशी करत सर्वकाही समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.