Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंतप्रधान मोदी कॅबिनेट आणि CCS ची आज महत्त्वाची बैठक होणार

Prime Minister Narendra Modi
, बुधवार, 14 मे 2025 (10:12 IST)
युद्धबंदीनंतर, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज पहिल्यांदाच मंत्रिमंडळ आणि सीसीएसची बैठक होणार आहे. बैठकीत ऑपरेशन सिंदूरची रणनीती, पहलगाम हल्ल्याचा तपास आणि सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेऊन महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. अशी माहित समोर आली आहे.
ALSO READ: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत भाजप व्यस्त, ५८ अध्यक्षांची घोषणा, २० शिल्लक
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानसोबतच्या सीमेवर युद्धबंदी झाल्यानंतर, आज म्हणजेच बुधवारी पहिल्यांदाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ आणि सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समिती (CCS) ची बैठक होणार आहे. सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्यानंतर सीसीएसची बैठक होईल. पहलगाम हल्ल्यानंतर सीसीएसच्या दोन बैठका आधीच झाल्या आहे. आज होणाऱ्या बैठकांमध्ये 'ऑपरेशन सिंदूर' नंतरची रणनीती, पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चौकशी आणि युद्धबंदीनंतरची परिस्थिती यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सीसीएस बैठकीत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो
ALSO READ: लज्जास्पद! शूटिंग पाहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण, दुकानात रात्रभर क्रूरता करण्यात आली
मंत्रिमंडळाच्या बैठकीला सर्व कॅबिनेट मंत्री उपस्थित राहतील, तर सीसीएस बैठकीला पंतप्रधान मोदींसह संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल उपस्थित राहतील. अशी माहिती सामोर आली आहे.

Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत भाजप व्यस्त, ५८ अध्यक्षांची घोषणा, २० शिल्लक