Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रशियाच्या Sputnik V लसीला भारतात मंजुरी

Centre approves Russia's Covid-19 vaccine Sputnik V
, सोमवार, 12 एप्रिल 2021 (16:08 IST)
रशियाच्या 'स्पुटनिक व्ही' या लसीच्या भारतात मंजुरी देण्यात आलीय. त्यामुळे आता कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन भारतीय लशींसोबत तिसऱ्याही लसीचा वापर लवकरच सुरु होऊ शकतो. 
 
लस संबंधातील तज्ज्ञ समितीनं रशियाच्या 'Sputnik V' या लसीला मंजुरी दिलीय. स्पुटनिकद्वारे सादर केलेल्या ट्रायल डाटाच्या आधारावर मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
 
हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅब्ससोबत मिळून 'स्पुटनिक व्ही' ची ट्रायल करण्यात आली. यासोबतच लसीचं उत्पादनही सुरू आहे. अशातच भारतात लसीच्या तुटवड्यासंबंधी तक्रार कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण आता भारतात तीन लसींचा वापर केला जाऊ शकेल.
 
सध्या देशात सीरम इन्स्टिट्युटच्या 'कोव्हिशिल्ड' आणि भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' या लसींचा वापर केला जातोय. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोठी बातमी, १०वी आणि १२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या