काँग्रेसने अखेर २० १९ निवडणुकांना सामोरं जाण्याआधी महाराष्ट्र प्रभारी बदलले आहेत. लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. निवडणुकीच्या वर्षातच हा महत्वपूर्ण बदल समजला जातो आहे. महाराष्ट्राचा प्रभार मोहन प्रकाश यांच्याकडेच अनेक वर्षांपासून होता. ए के अँन्टोनी हे प्रभारी असताना मोहन प्रकाश सहप्रभारी होते, त्यानंतर त्यांच्याकडेच ही जबाबदारी देण्यात आली होती. जवळपास नऊ वर्षे मोहन प्रकाश हे प्रभारी म्हणून काम करत होते.
राहुल गांधींनी संघटनेत अनेक बदल करायला सुरुवात केली आहे. अनेक राज्यात तरुण चेहऱ्यांना प्रभारी, प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हाराष्ट्रात मात्र 75 वर्षांच्या अनुभवाला प्राधान्य देण्यात आलं आहे. मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्राजवळच्या कर्नाटकमधले आहेत, मराठीची उत्तम जाण त्यांना आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्की पक्षाला होईल असे कॉंग्रेसला वाटत आहे. राज्यात काही ठिकाण सोडली तर कॉंग्रेस फार काही कमाल दाखवू शकलेली नाही.