राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना काँग्रेसने 13 जूनला दिल्लीत आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिले नाही. निमंत्रितांच्या यादीत मुखर्जींचे नाव नसल्याने काँग्रेस अद्यापही त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दुसरीकडे काँग्रेसने संयु्रत पुरोगामी आघाडीतील घटकपक्षांच्या नेत्यांना इफ्तार पार्टीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी आयोजित केलेल्या डिनर पार्टीला उपस्थित असलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही या पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. विरोधी पक्षांच्या प्रमुखांना वेळेअभावी पार्टीत सहभागी होता आले नाही तर, त्यांनी सहकार्यांना पाठवावे, असे आवाहनही काँग्रेसने केल्याचे सजते.
दरम्यान र्शमिष्ठा मुखर्जी यांनी प्रणवदा राजकारणात येणार नसलचे स्पष्ट केले आहे.