Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सरकारी इतमामात उद्या (शुक्रवारी) डॉ. लागू यांच्यावर अंत्संस्कार

Dr. Lagoo in Government Etihad tomorrow Funeral at applicable
पुणे , गुरूवार, 19 डिसेंबर 2019 (13:33 IST)
नटसम्राट डॉ. श्रीरा लागू यांच्या पार्थिवावर गुरुवार ऐवजी शुक्रवारी अंत्संस्कार करण्यात येणार आहेत. लागू
यांच्या पार्थिवावर शासकीय इमामात अंत्संस्कार करण्याचे आदेश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने काढले. उपसचिव उमेश मदन यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांना पत्राद्वारे तशी सूचना केली आहे.
 
दरम्यान, लागू यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे शुक्रवारी सकाळी 10 ते 11 या वेळेत ठेवले जाणार आहे. लागू निरीश्र्वरवादी होते. त्यामुळे धार्मिक विधी होणार नाहीत, असे लागू यच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
 
लागू यांचे चिरंजीव आनंद अमेरिकेत आहेत. ते आल्यानंतर गुरुवारी डॉक्टरांच्या पार्थिवावर अंत्संस्कार केले जातील,' असे लागू कुटुंबीयच्यावतीने सांगण्यात आले होते.
 
मात्र, आनंद गुरुवारपर्यंत पुण्यात पोहोचू शकत नसल्याने लागू यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी अंत्संस्कार करण्यात येतील, असे लागू यांच्या पत्नी दीपा श्रीराम आणि कन्या डॉ. शुभांगी कानिटकर यांनी स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

CAA विरोधातील आंदोलनाचे देशभरात पडसाद, रामचंद्र गुहा आणि योगेंद्र यादव ताब्यात