Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे: रिक्षाचालकाचे महिलेसमोर हस्तमैथुन

Pune news
, मंगळवार, 17 डिसेंबर 2019 (18:16 IST)
पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेला बघून एका रिक्षाचालकाने हस्तमैथुन केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 34 वर्षीय महिला रात्री नऊच्या सुमारास आपल्या पतीसह सोसायटीच्या जवळच्या दुकानात गेल्या होत्या. दोघे नवरा-बायको जवळपासच्या वेगवेगळ्या दुकानातून खरेदी करत होते. तेवढ्यात दुकानाच्या बाहेर येत असताना त्यांच्याकडे पाहून अज्ञात रिक्षाचालक हस्तमैथुन करत असल्याचे निदर्शनास आले. महिलेने पतीला बोलावण्याचा प्रयत्न करत असताना रिक्षाचालक पळून गेला. महिलेने या गोष्टीकडे त्यावेळी दुर्लक्ष केले.
 
परंतू दुसऱ्या दिवशी पुन्हा दुपारी असाच प्रकार तेव्हा घडला जेव्हा महिला आपल्या मैत्रिणीसह कॉफी शॉपवर होत्या. तेव्हा रिक्षाचालकाने महिलेकडून बघून अश्लील हावभाव करत इशारे केले आणि हस्तमैथुन करू लागला.
 
तेव्हा महिलेने रिक्षाचालकाचा रिक्षा क्रमांक घेऊन सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. विकृत रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निर्मला सीतारमण जगातील टॉप 100 सामर्थ्यवान महिलांच्या यादीत, जाणून घ्या कोण आहे नंबर 1