Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कारखान्यांना आग, कामगारांनी छतावरून उडी मारली, दोन जण जखमी

कारखान्यांना आग, कामगारांनी छतावरून उडी मारली, दोन जण जखमी
, शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (23:07 IST)
सोनीपतमधील जीटी रोडवर असलेल्या राय इंडस्ट्रियल परिसरात शुक्रवारी सकाळी 4 कारखान्यांना आग लागली. यावेळी तेथे काही मजूर काम करत होते. आगीपासून वाचण्यासाठी कामगारांनी छतावरून उडी मारली. यामध्ये दोन मजूर जखमी झाले आहेत. लोकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. आगीची तीव्रता पाहता सोनीपत आणि पानिपत येथून अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. कारखान्यांमध्ये टिनाचे शेड असल्याने आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठे प्रयत्न करावे लागले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
राय इंडस्ट्रियल एरियातील अल सुबल येथील पुठ्ठा आणि इतर वस्तूंच्या कारखान्याला शुक्रवारी आग लागली. त्यामुळे येथे काम करणाऱ्या काही कामगारांमध्ये खळबळ उडाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कामगारांनी घाईघाईने प्रयत्न सुरू केले, मात्र आगीने जवळच असलेल्या इतर तीन कारखान्यांनाही जळून खाक केले. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या काही मजुरांनी कारखान्यातून बाहेर पडण्याचा मार्ग न पाहता छतावरून उड्या मारल्या. त्यामुळे दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
कारखान्याला आग लागल्याची माहिती मिळताच राई व कुंडली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या व आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, आगीचा भडका पाहून सोनीपत आणि पानिपत येथूनही अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

2021 वर्ष अखेर : टोकियो ऑलिम्पिक कव्हरेजने काय शिकवलं?