Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पहिलं सहकार संमेलन : देशातील पहिलं सहकार संमेलन,अमित शहा जगभरातील लोकांना संबोधित करतील

First Co-operative Summit: The first co-operative summit in the country
, शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (11:06 IST)
गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा शनिवारी दिल्लीत सकाळी 11 वाजता देशातील पहिलं सहकार संमेलनला संबोधित करतील. भारतीय जनता पक्षाने ही माहिती दिली आहे. माहितीनुसार, या पहिल्या विशाल संमेलन मध्ये सामूहिक संस्थेशी संबंधित जगभरातील कोट्यवधी लोक ऑनलाइन सामील होतील. त्याचबरोबर इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात सहकारांशी निगडित सुमारे दोन हजार लोक उपस्थित राहतील. 
 
सहकार मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, हे  प्रथमच मोठे संमेलन आहे, ज्याला मंत्रालयाचे प्रभारी मंत्री संबोधित करतील आणि सरकारचे लक्ष्य देशासमोर मांडतील.या दरम्यान,ते या क्षेत्राच्या आणि देशाच्या विकासासाठी केलेल्या योजनांची माहिती देतील. 
 
सहकार राज्यमंत्री बीएल वर्मा आणि आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडीचे अध्यक्ष एरियल ग्वारकोही या संमेलनात सहभागी होतील.हे संमेलन इफ्को, नॅशनल कोऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया,अमूल,सहकार भारती या संस्थांद्वारे आयोजित केली जात आहे. इफ्कोने एका निवेदनात म्हटले आहे की,हे संमेलन जागतिक स्तरावर भारतीय सहकारी संस्थांना गती आणि मजबुती देईल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

UPSC मध्ये महाराष्ट्राचे 50 उमेदवार यशस्वी