सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दोन महिलांनी शबरीमला मंदिरात (Sabrimala Temple) प्रवेश करण्यात यशस्वी ठरल्या. आज सकाळी 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 2 महिलांनी मंदिरात प्रवेश करुन इतिहास रचला आहे. बिंदु आणि कनकदुर्गा अशी या दोन महिलांची नावे असल्याचे समजते.
शबरीमाला येथील आय्यप्पा मंदिरात महिलांना सरसकट प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्यावरून निर्माण झालेला वाद अद्यापही सुरूच आहे. यावरुन तेथील स्थानिकांनी आणि मंदिरातील पुजाऱ्यांनी महिला प्रवेशाला विरोध केला आहे. मात्र, बुधवारी पहाटे 3.45 वाजता दोन महिलांना आयप्पा मंदिरात प्रवेश केला. मध्यरात्री मंदिराच्या पायऱ्या चढण्यास त्यांनी सुरुवात केली होती. त्यावेळी, या दोन महिलांसमवेत काही पोलीस गणवेशात होते, तर काही पोलीस कर्मचारी सिव्हील ड्रेसमध्ये सुरक्षा पुरवत होते.