आज पासून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने देशभरात टोल टॅक्स 5 टक्क्यांनी वाढवला आहे. या मुळे आता वाहन चालकांना 5 टक्के जास्त टॅक्स भरावा लागणार आहे. या किमती एप्रिल पासून लागू करण्यात आल्या असून जून पासून वाढीव टॅक्स घेण्याचे ठरविले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, टोल टॅक्सचे नवे दर 3 जून म्हणजे आज पासून लागू होणार आहे. वाहनांवर 3 ते 5 टक्के टोल टॅक्स मध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ दरवाढीनुसार करण्यात आली आहे.
टोल टॅक्स मध्ये दरवाढ निवडणूक प्रक्रियेमुळे वाढवण्यात आली नव्हती. आता उद्या निकाल लागणार असून दरवाढ आजपासून करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्याचे बाहेर कोलमडणार आहे.
त्यामुळे महामार्गावरील प्रवास आता महागला आहे.देशभरातील सुमारे 1,100 टोल प्लाझांवरील टोल दरात वाढ होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जारी केलेल्या सुचनेनुसार, टोलनाक्याच्या 20 किलोमीटरच्या परिक्षेत्रात राहाणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी मासिक पासचे दरही वाढविण्यात आले आहेत.