Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

‘कडकनाथ’ वर भाभा अणुसंशोधन केंद्रात संशोधन

‘कडकनाथ’ वर भाभा अणुसंशोधन केंद्रात संशोधन
, बुधवार, 31 जानेवारी 2018 (16:04 IST)

कोंबड्यांची एक प्रजाती ‘कडकनाथ’ आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे देशभर प्रसिद्ध आहे. आता या कोंबड्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी त्याच्यावर मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात (बार्क) संशोधन होणार आहे. त्यासाठी रायपूरच्या इंदिरा गांधी कृषी विद्यापीठातील कृषी अनुसंधान केंद्रातून 25 कडकनाथ मुंबईला पाठवण्यात आले आहेत. पॅकेटबद्ध कडकनाथ मांस व अन्य पदार्थांबाबतही संशोधन केले जाणार आहे. 

या केंद्रात कडकनाथच्या मांसावरील प्रक्रियेबाबतही संशोधन केले जाणार आहे. कडकनाथच्या मांसाच्या क्यूब्स, सूप आणि कच्चे मांस वाळवून त्यापासून चिकन करी बनवण्याबाबतही नवे मार्ग शोधले जाणार आहेत. इंदिरा गांधी कृषी महाविद्यालयाचे कुलपती डॉ. एस. के. पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.

याबाबत ते म्हणाले, विद्यापीठाने चार महिन्यांपूर्वी भाभा अणुसंशोधन केंद्राशी करार केला आहे. त्यानुसार कांकेरवरून कडकनाथची पहिली खेप मुंबईला पाठवण्यात आली. लवकरच याबाबतचे संशोधन पूर्ण होईल आणि कडकनाथ खाण्याचे शौकिन असलेल्या लोकांना त्यांच्या मांसाचे पॅकेटही उपलब्ध होऊ शकेल. फास्ट फूडप्रमाणेच हे मांसही विक्रीसाठी आणता येऊ शकते. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ग्रीन कार्डसाठी लॉटरीऐवजी गुणवत्तेला प्राधान्य देणार : ट्रम्प