पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत म्हटलं की कोरोनाविरुद्ध देश मोठी लढाई लढत आहे. मागील वर्षी परिस्थिती वेगळी होती तर काही आठवड्यांपूर्वी परिस्थिती आटोक्यात होती. मात्र कोरोनाची दुसरी लाट वादळाप्रमाणे आली आहे.
ज्यांनी आपल्या जवळीक लोकांना गमावलं आहे, मी त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. कुटुंबातील एक सदस्य म्हणून, मी तुमच्या दु:खात सहभागी आहे. कोरोनामुळे प्राण गमवणार्यांना श्रद्धांजली देत ते म्हणाले की हे संकट मोठं आहे. आपल्याला र्धेय बाळगावा लागेल, साहस दाखवावा लागेल. अनुशासनाने वागल्याने परिस्थिती बदलेल कारण लॉकडाउन हा अंतिम पर्याय समजावा. त्यांनी म्हटलं की जनता स्वयंशिस्तीने वागाल्यास लॉकडाऊनची परिस्थिती येणार नाही.
देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. देश आणि राज्य सरकार ही गरज भागवण्यावर लक्ष ठेवत आहेत. देशात ऑक्सिजनची निर्मिती वाढवण्यावर लक्ष दिलं जात आहे, असं मोदींनी सांगितलं. केंद्र सरकार, राज्य सरकार, खाजगी कंपन्या यांच्याद्वारे ऑक्सिजन पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एक लाख नवे ऑक्सिजन सिलिंडर, औद्योगिक वापरासाठीचा ऑक्सिजन रुग्णांसाठी तसंच ऑक्सिजन एक्स्प्रेस हे उपाय केले जात आहेत. फार्मा कंपन्यांनी औषधाचं उत्पादन वाढवलं आहे.
जो त्रास तुम्हाला होत आहे त्याची मला पूर्ण जाणीव आहे."
मोठी लसीकरण मोहीम सुरु असून सध्या देशात दोन स्वदेशी लसीचं उत्पादन सुरु आहे. जगातील सगळ्यांत मोठी लसीकरण मोहीम आपण राबवत आहोत. 1 मे नंतर अठरा वर्षापेक्षा अधिक वयाच्या लोकांना लस देण्यात येईल. लस तयार होईल त्यापैकी अर्धा हिस्सा राज्यं आणि खाजगी क्षेत्राला मिळेल.
श्रमिकांना लस मिळेल तर कामगरांनी पलायन करुन नये. राज्य प्रशासनाला आग्रह आहे की त्यांनी श्रमिकांचा विश्वास मिळवावा. तुम्ही आहात तिथेच राहा. राज्यांद्वारे असा विश्वास मिळाला तर श्रमिकांचा फायदा होईल.
काळ कठीण आहे तरी आपण धैर्य सोडू नका. आपण कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रयत्न केला तरच विजय मिळवू शकतो. साहस, धैर्य आणि अनुशासन हा मंत्र समोर ठेवा.