Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाची वडिलांकडून हत्या

Webdunia
शुक्रवार, 8 मार्च 2024 (15:53 IST)
घरात लग्न असल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. घरात संगीत डान्स सुरु होते. सर्व जण आनंदात असताना या आनंदात विरजण पडले ज्या मुलाचे लग्न होते त्या नवरदेवाची लग्नाच्या एक दिवसा आधीच निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना  7 मार्च रोजी मध्यरात्री देवली एक्स्टेन्शनच्या राजू पार्कमध्ये घडली आहे. या प्रकरणी तरुणाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. गौरव सिंघल असे या मयत तरुणाचे नाव आहे. 
 
सदर घटना 7 मार्च च्या मध्यरात्री घडली आहे. 29 वर्षीय गौरव सिंघल नावाच्या तरुणावर चाकूने हल्ला झाल्याचं समोर आलं. कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात नेलं पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.मयत गौरव हा जिम चालवायचा. त्याच्या वडिलांनीच त्याची हत्या करून वडील घरातून फरार झाला. जाताना 50 लाखांचे सोने, 15 लाख रुपये घेऊन गेले.त्यांना जयपूर येथून अटक करण्यात आली. 

लग्नाच्या आदल्या दिवशी तरुणाला 15 वेळा चाकूने भोसकण्यात आलं होतं. चाकू मारल्यानंतर गौरवच्या मृतदेहाला फरफटत नेलं होतं. गौरवचा मृतदेह लवकर सापडू नये यासाठी प्रयत्न देखील करण्यात आले होते. घरातील इतर सर्वजण गाण्याच्या कार्यक्रमात होते. या तरुणावर चाकूने 15 वार करण्यात आले होते.

पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आल्यावर पंचनामा केला पोलिसांना संशय आहे की तरुणाच्या वडिलांनी इतर काही लोकांसह मिळून गौरवची . हत्या केली आहे. गौरवाची हत्या का करण्यात आली अद्याप हे कळू शकले नाही. गौरव हा कुटुंबियांच्या दबावात  येऊन हे लग्न करत होता या मुळे  त्याचे वडिलांशी भांडण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी मयत गौरवच्या वडिलांना जयपूर येथून अटक केली असून प्रकरणाचा तपास करत आहे. . 
 
 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

पुढील लेख
Show comments