Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑपरेशन गंगा : 2200 भारतीयांना घेऊन येणाऱ्या 11 उड्डाणे आज मायदेशी परतणार

Operation Ganga: 11 flights carrying 2200 Indians will return home todayऑपरेशन गंगा : 2200 भारतीयांना घेऊन येणाऱ्या 11 उड्डाणे आज मायदेशी परतणार Marathi National  News  In Webdunia Marathi
, रविवार, 6 मार्च 2022 (15:35 IST)
युक्रेनमधील विविध शहरांमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारील देश रोमानिया, हंगेरी, स्लोव्हाकिया आणि पोलंडमधून बाहेर काढले जात आहे. शनिवारी, हंगेरीतील बुडापेस्ट येथून पाच उड्डाणे, रोमानियामधील सुसेआवा येथून चार, स्लोव्हाकियामधील कोसिस येथून एक आणि पोलंडमधील रझेझा  येथून दोन उड्डाणे झाली, असे मंत्रालयाने सांगितले.रशियासोबत सुरू असलेल्या युद्धामुळे 24 फेब्रुवारीपासून युक्रेनचे हवाई क्षेत्र बंद आहे.
 
युक्रेनच्या शेजारील देशांतून 2,200 हून अधिक भारतीयांना घेऊन जाणारी 11 उड्डाणे रविवारी मायदेशी परतणार आहेत. रविवारी येणा-या फ्लाइटपैकी, स्लोव्हाकियामधील कोसिस येथून युक्रेनमध्ये अडकलेल्या 154 भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष विमान रविवारी सकाळी राष्ट्रीय राजधानी दिल्लीला पोहोचले. तर, हंगेरीतील बुडापेस्ट येथून 183 भारतीय नागरिकांना घेऊन दुसरे विशेष विमान सकाळी 6.30 वाजता दिल्लीला पोहोचले.
 
ऑपरेशन गंगा अंतर्गत आतापर्यंत 2,056 भारतीयांना हवाई दलाच्या 10 विशेष विमानांद्वारे आणण्यात आले आहे. युक्रेनच्या शेजारील देशांना 26 टन मदत सामग्रीही पोहोचवण्यात आली आहे.
 
IAF ची C-17 लष्करी वाहतूक विमाने देखील ऑपरेशन गंगा अंतर्गत वापरली जात आहेत तर Air India, Indigo, Vistara आणि SpiceJet देखील त्यांची सेवा देत आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND W vs PAK W: मिताली राजने मैदानात येताच इतिहास रचला, 6 विश्वचषक खेळणारी पहिली महिला क्रिकेटर बनली