Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

राहुल गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे अध्यक्षपद?; कार्यसमितीची आज बैठक

राहुल गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे अध्यक्षपद?; कार्यसमितीची आज बैठक
, सोमवार, 24 ऑगस्ट 2020 (12:56 IST)
भारतीय जनता पक्ष व संघ परिवाराचा देशात वाढता प्रभाव मान्य करून काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षांची गरज सोनिया गांधी यांच्याकडे पत्राद्वारे मांडल्यानंतर आता राहुल ब्रिगेड विरूद्ध काही ज्येष्ठ नेते असा नवा वाद रंगला आहे. मात्र पक्षाची धूरा गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे जाता कामा नये, असे बहुसंख्य नेत्यांचे म्हणणे दिसत आहे. पूर्णवेळ अध्यक्ष ही मागणी रास्त असली तरी गांधी कुटुंबाला पर्याय नाही. काँग्रेसचे नेतृत्त्व गांधी कुटुंबाकडेच असावे, अशी मागणी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली आहे. महाराष्ट्रातील बाळासाहेब थोरात यांच्याबरोबरच अन्य राज्यातील नेतेही हीच मागणी करू लागले आहेत.
 
सोनिया गांधी यांना पर्याय राहुल गांधीच मानणारा एक मोठा गट पक्षात असल्याने बिगर गांधी अध्यक्षाची चर्चा मावळण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी होणाऱ्या काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटतील. पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर राहुल गांधी यांचाच प्रभाव असतो. महाराष्ट्रातून दोनदा राज्यसभा सदस्यत्वासाठी प्रदेश काँग्रेस व ज्येष्ठ नेत्यांची इच्छा न जुमानता राहुल गांधी यांनीच उमेदवार निश्चित केला. अनेक राज्यांमध्ये स्थानिक नेत्यांचा निर्णय अमान्य करून राहुल गांधी यांनीच निर्णय घेतल्याची काँग्रेसमध्ये चर्चा आहे. राहुल गांधी यांचा सक्रियतेवरून वारंवार प्रश्न उपस्थित होतात. ते काही वेळा खूप आक्रमक असतात व मध्येच बोलायचे, नेत्यांना भेटायचे बंद करतात, असा आक्षेप आहे. त्यामुळेच काँग्रेसला पूर्णवेळ नेतृत्त्वाची गरज आहे, या नेत्याने लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये मिसळून काम करावे, अशी अपेक्षा पत्रातून व्यक्त करण्यात आली, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्याच्या ‘वॉरियर आजीं’साठी सोनू सूदने मार्शल आर्ट्स क्लास सुरु करुन दिला