Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज ठाकरे यांची व्यंगचित्रातून सरकारवर टीका

Raj Thackeray
, सोमवार, 4 जून 2018 (08:39 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. अवघ्या तासाभरात या व्यगंचित्राला हजारो  लाईक मिळाले असून तितकंच शेअरही करण्यात येतय. सोशल मीडियावर राज ठाकरे यांच व्यंगचित्र चर्चेता विषय बनलंय. या व्यंगचित्राच्या कमेंट बॉक्समध्ये राज ठाकरे आणि मोदी समर्थकांमध्ये जुंपलेली पाहायला मिळतेय. हिम्मत असेल तर राज ठाकरेंनी राहुल गांधींवर टीका करावी असे काहीजण म्हणताय तर २०१९ ला 'मी राज ठाकरे, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो....' असे म्हणत त्यांच्यावर विश्वासही दाखवत आहेत. 
 
इंधनाच्या भडकलेल्या किंमतींच समुद्राला उधाणं आलंय. या उधाण आलेल्या समुद्रात नौका बुडत आहे. इतकी मरणासन्न अवस्था असतानाही नौकेत बसलेले पंतप्रधान सामान्य नागरिकांना पेट्रोल ३ पैशांनी कसे कमी झाले याबद्दल सांगत आहेत. या सर्वामध्ये सामान्य नागरिकांची ससेहेलपट झाल्याचे दिसत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जास्त सामान काहून नेणाऱयांकिरोधात रेल्वेकडून कारवाई