Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

सरार्स विकले जात आहे मुलींचे मोबाइल नंबर

सरार्स विकले जात आहे मुलींचे मोबाइल नंबर
उत्तर प्रदेशात सरार्स सुंदर मुलींचे मोबाइल नंतर विकण्याची धक्का देणारी बातमी समोर आली आहे. दुसरीकडे फेसबुकवरही अश्या प्रकाराचे काम होत असल्याचे उघडकीस आले आहे.
 
उत्तर प्रदेश पोलिसांप्रमाणे राज्यात मुलींच्या मोबाइल नंबरची सरार्स विक्री सुरू आहे. मुलींच्या मोबाइल नंबरची किंमतही त्यांच्या सुंदरतेच्या हिशोबाने ठरवली जात आहे. हे नंबर अजून कोणी नाही तर ते दुकानदार विकत आहे ज्यांच्या दुकानांवर मुली मोबाइल रिचार्ज करायला येतात, ते लोकं हे नंबर विकत आहे.
 
आता ज्या लोकांना नंबर विकत घेतले आहेत ते मुलींना परेशान करून राहिले आहेत. महिला पोलिस हेल्पलाइन 1090 यावर आलेल्या तक्रारींनंतर हे प्रकरण उघडकीस आले. हिंदुस्तान टाइम्सप्रमाणे 15 नोव्हेंबर 2012 ते 31 डिसेंबर 2016 यादरम्यान एकूण 6 लाख 61 हजार 129 तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. यातून 5 लाख 82 हजार 854 तक्रारी फोनवर परेशान करण्याबद्दल होत्या.
 
दुसरीकडे फेसबुकवर या प्रकाराचे ग्रुप सक्रिय आहेत. फेसबुक पेजवर सुंदर मुलींचे फोटो लावले जातात ज्यावर लिहिले असतं की पेज लाइक करा आणि सुंदर मुलीचा मोबाइल नं‍बर मिळवा. अश्या पेजवर या धंध्याशी संबंध नसलेल्या मुलींचे फोटोदेखील वापरले जातात याची शक्यता नाकारता येणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महापौरपदाची सोडत : 27 पैकी 14 महापालिकांचे महापौरपद महिलांसाठी राखीव