Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शहीद दिन; भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांच्या स्मरणार्थ

national news
स्वातंत्र्य सैनिक भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी  या सर्वाना आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिवाची बाजी लावणारे ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस 'शहीद दिवस' म्हणून साजरा केला जातो असतो.

या मध्ये ब्रिटीश  सायमन  कमिशनचा विरोध करणारे लाला लजपत राय यांचा इंग्रजांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला. यामुळे चंद्रशेखर आझाद, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव आणि अन्य क्रांतिकारकांनी लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. शेवटी त्यांनी 17 डिसेंबर 1928 रोजी ब्रिटिश अधिकारी साँडर्सला गोळ्या घालून ठार केले होते. या प्रकरणी इंग्रजांनी भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना अटक करून फाशीची शिक्षा सुनावली.

23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी तिघांना फाशी देण्यात आली. फाशीच्या वेळी तिघांनी 'मेरा रंग दे बसंती चोला, माय रंग दे; मेरा रंग दे बसंती चोला।' हे गाणे गायले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मागासवर्गीया साठी राहुल गांधी यांचे आंदोलन