Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धक्कादायक ! छत्तीसगड मध्ये विषारी सापाला मारून खालले,रुग्णालयात दाखल

Shocking! Killed and eaten by poisonous snake in Chhattisgarh
, बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (11:13 IST)
कोरबा : छत्तीसगडमधील कोरबा येथे एका घरात निघालेल्या सापाला लोकांनी मारून अर्धवट अवस्थेत जाळून फेकले.शेजारी राहणाऱ्या 2 लोकांनी मंदधुंध अवस्थेत या जाळलेल्या विषारी सापाला खालले.त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले.

कोरबा शहरातील सिटी पोलीस ठाण्यातील परिसरात ही घटना घडली.ज्यांनी या घटने बद्दल ऐकले त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.हे दोघे नशेत असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांपैकी एकाने सापाचे तोंड तर दुसऱ्याने सापाची शेपूट खाल्ल्याचे सांगितले जात आहे. तब्बेत बिघडल्यावर कुटुंबातील सदस्यांनी त्यांना वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी जाळलेल्या सापाच्या मृतदेहाचे अवशेष जप्त केले आहे.पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.
कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की आम्ही त्यांना असं करण्यापासून रोखले असताना त्यांनी आमचे ऐकले नाही आणि त्या विषारी सापाला खालले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना : पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक सक्रीय रुग्ण का आहेत?