Delhi News : दिल्लीत वादळ आणि पावसामुळे विमान प्रवासावर परिणाम झाला आहे. दिल्ली विमानतळाने प्रवाशांना घराबाहेर पडण्यापूर्वी त्यांच्या विमान उड्डाणाचे वेळापत्रक तपासून घेण्यास सांगितले आहे. आतापर्यंत ४० उड्डाणे रद्द करण्यात आली आहे आणि १०० उड्डाणे उशिराने सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील खराब हवामानामुळे १४० हून अधिक विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे. पाऊस आणि वादळामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावरून ४० उड्डाणे रद्द करण्यात आली आहे, तर १०० उड्डाणे उशिराने सुरू झाली आहे. तसेच एक विमान अहमदाबाद आणि दोन विमाने जयपूरला वळवण्यात आली आहे, तर इतर अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वात मोठे आणि व्यस्त विमानतळ आहे, जे दररोज सुमारे १,३०० उड्डाणे हाताळते. शुक्रवारी सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वादळ आणि जोरदार वाऱ्यांमुळे विमान वाहतूक प्रभावित झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Edited By- Dhanashri Naik