Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tamil Nadu : उकळत्या रसम मध्ये पडून तरुणाचा दुर्देवी मृत्यू

Webdunia
सोमवार, 1 मे 2023 (18:04 IST)
लग्नाच्या धावपळीमध्ये एका तरुणाचा उकळत्या रसममध्ये पडून भाजून दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूच्या तिरुवल्लूर येथे घडली आहे. 

सदर घटना गेल्या आठवड्याची आहे. पीडित मयत विद्यार्थी असून कोरुक्कुपेट या ठिकाणी एका खासगी कॉलेजात BCA च्या शेवटच्या वर्षात शिकत असून व्ही सतीश असं त्याच नाव होत. मोकळ्या वेळेत तो केटरिंगचं काम करत होता.
 
लग्न मंडपात आलेल्या पाहुण्यांना जेवण वाढताना किचन मध्ये जात असताना पाय घसरून उकळत्या रसमच्या (Rasam) भांड्यात पडला. उपस्थित असणाऱ्या इतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी सतीशला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. डॉक्टरांची त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला दुसऱ्या  ठिकाणी नेण्यास सांगितले. तो उपचाराधीन असताना त्याचा दुर्देवी मृत्यू  झाला.   
 
सतीश या अपघातात गंभीररित्या  भाजला होता. पण तो उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. रविवारी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच सतीशच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आला आहे. सतीशचे आई वडील कामगार असून मजुरी करुन ते पोट भरतात.
 
 
 
Edited By - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments