Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राम मंदिराचे दरवाजे: महाराष्ट्रातील जंगलातील सागवान लाकूड वापरण्यात येणार

Webdunia
गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (08:37 IST)
राम मंदिराचे दरवाजे तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील जंगलातील सागवान लाकूड वापरण्यात येणार आहे. मोर, कलश, सूर्य, चक्र, शंख, गदा आणि विविध फुलांचे विशेष कोरीवकाम असलेले मंदिरातील 42 दरवाजे तयार करण्यासाठी सुमारे 1,700 घनफूट लाकूड लागणार आहे, अशी माहिती मंदिर ट्रस्टने दिली आहे. गर्भगृह आणि तळमजल्यावर पाच मंडपांसह तीन मजल्यांवर बांधकामाचे काम सध्या जोरात सुरू आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे बांधकाम ठप्प झाले होते.
 
रिपोर्ट्सनुसार, अयोध्येतील मंदिर ट्रस्टने योजनेनुसार काम सुरू असल्याचा दावा केला आहे आणि डिसेंबर 2023 पर्यंत भक्तांना रामलल्लाचं दर्शन घेता येईल असं सांगितलं आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत समान पातळीचे बांधकाम आणि नक्षीकाम राखण्यासाठी मंदिराच्या सर्व भागात एकाच वेळी बांधकाम केले जात असल्याचे ट्रस्टने म्हटले आहे. 6.5 मीटर (21 फूट) उंच प्लॅटफॉर्मवर ग्रॅनाइट दगडापासून मंदिराची वरची रचना बांधली जात आहे. जी सप्टेंबर 2022 मध्ये पूर्ण झाली. प्लिंथच्या बांधकामात इंटरलॉकिंग व्यवस्थेमध्ये दोन टन वजनाचे सुमारे 17,000 ग्रॅनाइट स्टोन ब्लॉक वापरले गेले.
 
मंदिराची रचना राजस्थानी दगडात कोरलेली
मंदिर ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार एकूण बिल्ट-अप क्षेत्र 58,920 स्क्वेअर फूट इतके आहे आणि तीन-स्तरीय संरचना पूर्ण केल्यानंतर तळमजला 72 फूट पोहोचला आहे. यासोबतच भरतपूर जिल्ह्यातील बन्सी पहारपूर येथील राजस्थानी दगड वापरून मंदिर बांधले जात असल्याचेही ट्रस्टने स्पष्ट केले आहे. बन्सी पहारपूरचा सुमारे 4.75 लाख घनफूट दगड मंदिराच्या रचनेत वापरण्यात येणार आहे. मंदिराच्या गर्भगृहातील भिंती आणि मजला संगमरवरी असेल.

Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments