Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भयंकर, मृतदेहाला लागल्या मुंग्या, रूग्णालयाने दिले 'हे' स्पष्टीकरण

Terrible
, सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (21:15 IST)
सोलापुरातील बुधवार पेठेतील राकेश मोरे (२०) युवकावर गेल्या चार दिवसांपासून सिव्हिल हॉस्पीटलमध्ये टीबी आजारावर उपचार सुरु होते. यातच राकेशचं निधन झाल्यानंतर ही माहिती डॉक्टारांनी राकेशाच्या नातेवाईकांनी दिली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना मृत राकेशच्या संपूर्ण शरीराला मुंग्या लागल्या होत्या. राकेशच्या मृत्यूस सिव्हिल हॉस्पिटल मधील डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप राकेशच्या नातेवाईकांनी केला आहे.
 
तर उपचारात कोणताही हलगर्जीपणा झाला नसल्याचं स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनानं दिलं आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्ण गंभीर असल्याची कल्पना देण्यात आलेली होती. मृत्यू झाल्याचे सांगितल्यानंतर गाडी आणण्याचे कारण सांगून नातेवाईक निघून गेले. संध्याकाळपर्यंत शव हे जनरल वार्डातच होतं.  रुग्णाला नाकाद्वारे दूध दिले जातं होते. तसंच सलाईनमध्ये देखील साखरेचे प्रमाण असतं. नातेवाईकांनी दिरंगाई केल्याने तसेच काही प्रमाणात अस्वच्छता असल्याने हा प्रकार घडला असल्याची शक्यता असल्याचे स्पष्टीकरण रुग्णालयाच्या वतीने देण्यात आलं आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुजरात टायटन्स संघातील खेळाडूंची संपूर्ण यादी