Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नववधूला मिळाले मित्रांकडून हे गिफ्ट, नववधूला धक्काच बसला, व्हिडीओ व्हायरल

The bride got this gift from friends
, शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (18:56 IST)
सध्या लग्नसराई सुरु आहे. लग्नात मित्र मैत्रिणी प्रचंड दंगा करतात आणि एन्जॉय करतात. लग्नाच्या हंगामात अनेक वेळा असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, ज्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. लग्नात स्टेजवर बसलेल्या वरवधूंना गिफ्ट देण्याची प्रथा आहे. कधी काही लोक असे काही गिफ्ट देतात ते पाहून आश्चर्याचा धक्काच बसतो. असाच एक लग्नाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

या व्हिडिओमध्ये वरवधू हे स्टेजवर बसले आहे. तेव्हा त्यांच्या एका मित्राने त्यांना एक मोठा बॉक्स भेटवस्तू म्हणून दिले. भेटवस्तू पाहून नववधू खूप उत्साहित झाली तिने स्टेजवरच ते गिफ्ट बॉक्स उघडण्याचा निर्णय घेतला आणि तिने तो गिफ्ट  बॉक्स उघडला .त्यात एक अजून बॉक्स होता. अशा प्रकारे तिला अनेक पॅकेट उघडावे लागले.

शेवटचे पॅकेट उघडल्यावर तिला आश्चर्याचा धक्काच बसला आणि ती विचारात पडली. तिला त्या पॅकेट मध्ये सर्जिकल मास्क दिसला. हे गिफ्ट बघून तिला खुद्कन हसू आले. एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये उघडल्यावर तिला मास्क आढळला यावर तिचा विश्वासच बसेना. मित्राचा या मागे हेतू होता की कोरोनाच्या काळात लग्नाच्या वेळी देखील मास्कचा वापर करायला पाहिजे. 

हा व्हिडीओ ज्याने बघितला त्याला हसू अनावर झाले. इंस्टाग्राम वर हा घंटा नावाच्या अकाऊंटवरून अपलोड करण्यात आले आहे. हा व्हिडीओ तब्बल 2 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात कोरोनाची लाट लवकरच ओसरणार, आरोग्य मंत्र्यांची माहिती