आपल्या देशात काही शहरात रस्ते कमी तर खड्डे जास्त दिसतात.पावसाळ्यात या मध्ये पाणी साचत आणि लोक पडतात. तसे पण लोक या खड्ड्यामुळे हैराण असतात. पण या खड्ड्यामुळे एखाद्याचा जीव पुन्हा आला आहे असे क्वचितच घडते. खरं तर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका दुखी कुटुंबात पुन्हा आनंद पसरला आहे.मृत घोषित केल्यावर या वृद्धाने तीन तासानंतर श्वास घेतल्याची आश्चर्यजनक घटना हरियाणात घडली आहे. हरियाणाच्या कर्नालच्या गोंदार मध्ये ही घटना घडली आहे.
दर्शन कॉलनी, गोंदर रोड, निसिंग शहरातील रहिवासी असलेले 75 वर्षीय दर्शन सिंह यांच्यावर अनेक दिवसांपासून पटियाला येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मोठा मुलगा गुरनाम सिंग आपल्या वृद्ध वडिलांची काळजी घेत होता.
गुरुवारी सकाळी डॉक्टरांनी वृद्धाला मृत घोषित केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी कारने निसिंग येथे आणले जात होते. दरम्यान, कैथल जिल्ह्य़ातील धांडजवळ रस्त्यावर खड्डे पडल्याने कारला जोरदार धक्का लागला आणि या मुळे मृत वृद्धाचा श्वास पुन्हा सुरु झाला. यामुळे घरच्यांना धक्का बसला आणि त्यांनी तातडीने वृद्धेला निसिंग येथील खासगी रुग्णालयात नेले.
तपासणीनंतर डॉक्टरांनी वृद्ध व्यक्ती जिवंत असल्याची पुष्टी केली. त्यांना एका खासगी रुग्णालयात आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले असून आजोबा त्यांच्या कुटुंबियांशी बोलले. त्यांना जास्त बोलता येत नाही तरीही.
मृत्यूची बातमी समजताच घरावर मोठी गर्दी झाली होती. अखेरच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी नातेवाईक आणि परिसरातील ओळखीचे लोकही घरी पोहोचले होते. वृद्धाचा श्वास परत आल्याची बातमी समजताच सगळेच चक्रावून गेले.