Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिल्लीतील उद्योग भवन आयईडी स्फोटाने उडवून देण्याची धमकी, मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना आला मेल

दिल्लीतील उद्योग भवन आयईडी स्फोटाने उडवून देण्याची धमकी
, शुक्रवार, 30 मे 2025 (19:19 IST)
उद्योग भवन आयईडी स्फोटाने उडवून देण्याची धमकीचा मेल मिळाल्यानंतर अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलीस आणि सीआयएसएफ पथक घटनास्थळी पोहोचले. शोध मोहीम सुरू आहे.
 
तसेच राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील उद्योग भवन आयईडी स्फोटाने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. स्टील मंत्रालय आणि अवजड उद्योग मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकीचा मेल आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उद्योग भवन आयईडी स्फोटाने उडवून देण्याची धमकीचा मेल मिळाल्यानंतर अलर्ट जारी करण्यात आला आहे. सीआयएसएफला योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहे.  धमकी मिळाल्यानंतर परिसरातील इमारतींच्या प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. पोलिस आणि सीआयएसएफ पथक घटनास्थळी पोहोचले. श्वान पथकाच्या मदतीने उद्योग भवनात शोध मोहीम सुरू आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Vaishnavi Hagavane case मुख्य आरोपी नीलेश चव्हाणला नेपाळ सीमेवरून अटक