Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुर्गा सप्तशती पाठ करत असल्यास खबरदारी घेणे आवश्यक

Webdunia
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (14:26 IST)
नवरात्राचा हा पावित्र्य सण सुरू झाला आहे. सगळीकडे एक पावित्र्य आणि धार्मिक वातावरण सुरू आहे. पण सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळे सण घरातच साजरे केले जात आहे. अशामुळे लोकं आपापल्या घरातच भजन, पाठ करत आहे. जर आपण आपल्या घरातच दुर्गासप्तशतीचे पठण करत असाल, तर काही सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे नाही तर चांगल्याच्या ऐवजी आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. हे प्रत्येक चंडी किंवा दुर्गासप्तशती चा पाठ करणाऱ्यांसाठी समजून घेणं गरजेचं आहे. 
 
1 हे तर सर्वांना माहीतच आहे की हनुमानाने 'ह' च्या ठिकाणी 'क' केले असे ज्यामुळे रावणाच्या यज्ञाची दिशाच बदलून गेली. त्याच प्रकारे आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचताना हे लक्षात ठेवावं की पाठाचे उच्चारण स्पष्ट आणि शुद्ध असावे.
 
2 चंडी पाठ करण्याच्या पूर्वी खोली शुद्ध, स्वच्छ, शांत आणि सुवासिक असावी. देवी आईच्या मूर्ती जवळ, देऊळात किंवा जवळ कोणत्याही प्रकाराची अशुद्धता नसावी.
 
3 चंडी पाठ किंवा दुर्गा सप्तशती पाठच्या दरम्यान रजस्वला बायकांना त्या पूजेच्या स्थळापासून किंवा देऊळापासून दूर राहावं, नाही तर चंडीचे पाठ करणाऱ्यांना वाईट परिणाम भोगावे लागतात.
 
4 चंडी पाठ करताना पूर्ण ब्रह्मचर्यच्या व्रताचे पालन करावे आणि वाचिक किंवा तोंडी परंपरेचे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वच्छतेचे पालन करावं. 
 
5 चंडी पाठच्या दरम्यान साधारणपणे चंडीपाठ करणाऱ्यांना वेग वेगळे चांगले आणि वाईट अध्यात्मिक अनुभव येतात. त्या अनुभवांना सहन करण्याची इच्छा शक्ती घेऊनच चंडीपाठ करावं. 
 
असे म्हणतात की आपण ज्या इच्छापूर्ती साठी चंडीपाठाचे वाचन करत आहात, आपली ती इच्छा नवरात्राच्या काळात किंवा दसऱ्या पर्यंत पूर्ण होते. पण आपण जर का निष्काळजी पणा करत असाल आणि आपल्या कडून काहीही कळत-नकळत चुका होत असल्यास, आपल्या बरोबर अघटित घडतं किंवा अपघात होतात.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शनिवारी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हे काम नक्की करा

वामनस्तोत्रम्

108 names of goddess Lakshmi देवी लक्ष्मीची 108 नावे, शुक्रवारी जपा आणि कृपा‍ मिळवा

आरती शुक्रवारची

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments