suvichar

मोबाईलच्या लाईफ टाईम मोफत इनकमिंग योजनेत बदल

Webdunia
आता एअरटेल व व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांकडून लवकरच लाईफ टाईम मोफत इनकमिंग योजनेत बदल केला जाणार असून ग्राहकांचा मोबाईल फोन कायम वापरात रहावा यासाठी इनकमिंग कॉलवर किमान शुल्क आकारले जाणार आहे.
 
जीओच्या स्पर्धेमुळे या कंपन्यांचा महसूल घटलाच, शिवाय त्यांना सतत आपल्या दरपत्रकातही बदल करणे भाग पडत आहे. परिणामी ग्राहकांना आता फार काळ लाईफ टाईम मोफत इनकमिंग योजनेचा लाभ मिळणार नाही. या निर्णयामुळे अनेक ग्राहकांना मोठा धक्का बसणार असला तरी मिनिटामिनिटाला येणार्‍या इनकमिंग कॉलसाठी ग्राहकांनी गोंधळून जाण्याची गरज नाही. प्रत्येक मिनिटला येणार्‍या इनकमिंग कॉलवर शुल्क आकारणी केली जाणार नाही. काही वैध कालावधीसाठी ग्राहकांनी किमान रक्कम भरुन रिचार्ज केल्यास त्यांना मोफत इनकमिंग कॉल्सचा लाभ घेता येणार आहे.
 
एअरटेलने किमान रिचार्जसाठी  35 रु., 65 रु. व 95 रु. अशा तीन योजना जाहीर केल्या आहेत. या योजनेंतर्गत डाटा, टॉकटाईम व 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. याचप्रमाणे व्होडाफोन-आयडिया यांनीही लाईफ टाईम मोफत इनकमिंग योजनेपासून फारकत घेत ग्राहकांसाठी दरमहा किमान 30 रु. शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

शायना एनसी नोरा फतेहीच्या 'सरके चुनर' गाण्यावर भडकल्या; म्हणाल्या-"बॉलिवूडने आपली जबाबदारी ओळखावी"

महाराष्ट्र विधानसभेत वन्यजीव विधेयकाला मंजुरी

प्रीमियम पेट्रोलच्या किमतीत वाढ: कारणे आणि परिणाम

करिअर, प्रेम आणि आयुष्यातील सर्व समस्या जादुईरित्या सोडवण्याचा दावा; मुंबईतील तरुणीची लाखो रुपयांची फसवणूक

"भारताने इराणला पाठिंबा द्यायला हवा होता, पण पंतप्रधान मोदींनी साधा निषेधही केला नाही,"- राज ठाकरे

पुढील लेख
Show comments