Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

येत आहे सर्वात स्वस्त 50MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी असलेला नवीन 5G स्मार्टफोन

Coming is the newest 5G smartphone with the cheapest 50MP camera and 6000mAh battery येत आहे सर्वात स्वस्त 50MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी असलेला नवीन 5G  स्मार्टफोनNew Gadgets Marathi  Marathi IT News
, शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (16:37 IST)
टेक्नो पुढील आठवड्यात भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीच्या या नवीन हँडसेटचे नाव Tecno Pova 5G आहे. कंपनीने प्रसिद्धीपत्रकात पुढील आठवड्यात फोन लाँच करण्याची माहिती दिली. तसेच, कंपनीने पुष्टी केली आहे की युजर्स अमेझॉन वरून Tecno Pova 5G खरेदी करण्यास सक्षम असतील. कंपनी सोशल मीडियावर या फोनचे टिझ करत आहे.
 
एक ते दोन दिवसांत या फोनच्या लॉन्च तारखेबाबतही माहिती दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा फोन नायजेरियामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. 50-मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेर्‍याशिवाय यामध्ये आणखी अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.
 
टेक्नो पोवा  5G ची वैशिष्ट्ये 
फोनमध्ये, कंपनी 120Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.9-इंचाचा फुल HD + LCD डिस्प्ले देणार आहे. कंपनीचा हा 5G स्मार्टफोन नायजेरियामध्ये 8 GB RAM + 128 GB अंतर्गत स्टोरेजच्या सिंगल व्हेरियंट मध्ये येतो. भारतातही या व्हेरियंटमध्ये लॉन्च केले जाईल असे मानले जात आहे. कंपनी या फोनमध्ये LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 स्टोरेजसह मीडियाटेक डायमेन्सिटी 900 चिपसेट देत आहे.
फोटोग्राफीसाठी फोनच्या रिअर मध्ये  एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आहे ज्यामध्ये 2-मेगापिक्सेल सेकेंडरी लेन्स आणि एक AI लेन्स आहे.तर , कंपनी सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. 
 
फोनला पॉवर देण्यासाठी, यात 6000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज हा फोन अँड्रॉइड 11 वर आधारित HiOS 8 वर काम करतो. भारतात हा फोन कोणत्या कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केला जाईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. जोपर्यंत किंमतीचा संबंध आहे, तर हा फोन भारतात 18 हजार ते 20 हजार रुपयांच्या किंमतीसह येऊ शकतो.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे एवढा पैसा, घर नाही पण रिव्हॉल्व्हर-रायफल