सॅमसंगने Galaxy S20 सीरीज लॉन्च केली आहे. या सीरीजचे तीन स्मार्टफोन Galaxy S20, Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra लॉन्च केले आहेत. या तीन स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आणि डिस्प्ले साइजचं अंतर आहे. Galaxy S20ची किंमत जवळपास ७१,३०० रुपये आणि Galaxy S20 +ची किंमत जवळपास ८५,५०० रुपये असण्याची शक्यता आहे.
या तीनही स्मार्टफोनमध्ये एकसारखाच प्रोसेसर वापरण्यात आला आहे. पण या Galaxy S20, Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra मध्ये कॅमेरा, बॅटरी आणि डिस्प्ले यांसारख्या फिचर्समध्ये बदल करण्यात आले आहेत.
काय आहेत फिचर्स -
- या तिनही फोनमध्ये QHD (1,440x3,200 पिक्सल) रिजोल्यूशन
- AMOLED 2X डिस्प्ले
- १२८ जीबी स्टोरेजसह ८जीबी ते १२ जीबी पर्यंतचा रॅम देण्यात आला आहे.
- Galaxy S20 मध्ये ४०००mAH बॅटरी, तर Galaxy S20 + मध्ये ४५००mAHची बॅटरी देण्यात आली आहे.
कॅमेरा -
सॅमसंगच्या या स्मार्टफोन्समध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात सुपर स्पीड डुअल पिक्सल AF आणि OISसह, १२MP वाइड ऍन्गल सेन्सर, १२MP अल्ट्रा-वाइड ऍन्गल सेन्सर आणि PDAF आणि OISसह ६४MP टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला.