Marathi Biodata Maker

अजित पवारांनी 'या' कारणासाठी व्यक्त केली दिलगिरी

Webdunia
रविवार, 20 जून 2021 (11:43 IST)
पुण्यात शनिवारी (19 जून) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन होत असताना त्याठिकाणी मोठी गर्दी झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला पण निर्बंध लागू असताना प्रचंड गर्दी जमल्याने अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली.
 
पुण्यात विकेंडला लॉकडॉऊन असूनही मोठया संख्येने कार्यकर्ते कसे जमले? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. गर्दीत लोक कुठेही सुरक्षित अंतर पाळत असताना दिसले नाही. याप्रकरणी अजित पवार यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे. 

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "मला कल्पना नव्हती एवढे लोक येतील. मी कार्यक्रम साधेपणाने करायला सांगितला होता. मी येणार नाही असं कळवलं होतं पण कार्यकर्ते नाराज होतील म्हणून मी आलो. मला अशा कार्यक्रमासाठी बोलवलं जातं, जिथे धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही. मी पुणेकरांची दिलगिरी व्यक्त करतो."याप्रकरणी अॅक्शन घेण्याची सूचना केली आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

पुण्यातील ६१,९०० शेतकऱ्यांची ५३३ कोटी रुपयांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू

बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी पुरुष आणि महिला भारतीय संघांची घोषणा

अभिजीत दीपके यांना टायफॉइड झाल्याचे निदान, चळवळ सुरु राहील म्हणाले

महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणातील मुख्य आरोपी बीरेंद्रकुमार गुप्ता याला बिहारमधून अटक

भारत आणि पाकिस्तान उपांत्यपूर्व फेरीपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करतील, आशियाई खेळांमधील क्रिकेटचे वेळापत्रक जाणून घ्या

पुढील लेख
Show comments