Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवेंद्र फडणवीस दबंग नेते, 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात – चंद्रकांत पाटील

Devendra Fadnavis is a domineering leader
, सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (16:34 IST)
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी एक धक्कादायक वक्तव्य केले.अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले,‘ देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत,अजित पवारांसारखे 100 जण खिशात घेऊन फिरत असतात’.पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.
 
किरीट सोमय्या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आपल्या राहत्या घरी पत्रकार परिषद घेतली होती.त्या पत्रकार परिषदेत त्यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहमंत्रीपद देऊ नये असा सल्ला मी उद्धव ठाकरेंना दिला होता’ असा गौप्यस्फोट केला.याला धरूनच पहाटे जेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र शपथ घेतली होती तेव्हा हाच सल्ला देवेंद्र फडणवीस यांना दिला होता का?असा प्रश्न पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला होता.
 
त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, याची गरजच नव्हती कारण देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत.ते शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात.उद्धव ठाकरे सारखंच काम नाहीये.राज्यात काय चाललंय याची माहिती देखील उद्धव ठाकरे नसते. देवेंद्र फडणवीस यांच्या वयावर जाऊ नका. शिवसेनेने सतत त्रास दिल्यानंतरही महाराष्ट्रात सलग पाच वर्षे ते मुख्यमंत्री राहिले आहेत. तेव्हादेखील काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता परंतु देवेंद्र फडणवीस या सर्वांना पुरून उरले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजप प्रवेशाचे ‘ऑफर लेटर’ घेऊन आम्ही फिरत नाही; फडणवीसांचा पलटवार