Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात झिका व्हायरसचा पाचवा रुग्ण आढळला

Fifth patient of Zika virus found in Pune
, सोमवार, 1 जुलै 2024 (19:13 IST)
गेल्या आठवड्यापासून पुण्यात झिका व्हायरसच्या रुग्णात वाढ होत आहे. पुण्यात झिका व्हायरसचा पाचवा रुग्ण आढळला असून एका 28 वर्षीय गर्भवती महिलेला या व्हायरसची लागण लागली आहे. 

ही महिला बाधित रुग्णाच्या घराजवळ राहत असून एरंडवणे येथील तीन गर्भवती महिलांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी दोन्ही महिलांचे अहवाल निगेटिव्ह आले मात्र या महिलेला झिका व्हायरसची लागण लागल्याचे आढळून आले. मात्र या महिलेमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नाही.

आणखी तीन नमुने पाठवण्यात आले असून त्यांच्या निकालाची प्रतीक्षा आहे. आरोग्य विभाग अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. घरात पाणी साचू नये याची काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. या व्हायरस साठी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.

Edited by - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक