झिका व्हायरसची एंट्री पुण्यात झाली असून पुण्यात दोन प्रकरणे उघडकीस आली आहे. एका डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण लागली आहे. या प्रकारणांनंतर आरोग्य विभाग सतर्क झाला असून लोकांना या बाबत जागरूक केले जात आहे.
पुण्यातील एरंडवणे भागातील रहिवासी एका 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण लागल्याचे उघडकीस आले असून त्या दोघांची प्रकृती स्थिर आहे.
या दोघांना ताप आला आणि नंतर अंगावर पुरळ उठले. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या रक्ताची चाचणी घेण्यात आली आणि शहरातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) मध्ये पाठविण्यात आले.
रक्ताचा अहवालात त्यांना झिका व्हायरसची लागण लागल्याचे आढळले.त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांच्या रक्ताचे नमुने देखील तपासणीसाठी पाठविले आहे. या तपासणीत त्यांच्या 15 वर्षाच्या मुलीला देखील या विषाणूची लागण लागल्याचे समजले.
झिका विषाणू हा संक्रमीत एडिस डासाच्या चाव्याद्वारे पसरतो. याला डेंग्यू आणि चिकनगुनिया या सारखे संसर्ग पसरवण्यासाठी ओळखले जाते. पुण्यात या विषाणूची एंट्री झाल्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाळत ठेवण्यास सुरु केले आहे.
या परिसरात इतर कोणतेही संशयित रुग्ण आढळले नसले तरी महापालिका अधिकाऱ्यांनी डासांना प्रतिबंध करण्यासाठी फॉगिंग आणि फ्युमिगेशन यासारख्या खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरु केले आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने सर्वसामान्यांना जागरूक करण्यास सुरुवात केली आहे. परिसरातील गर्भवती महिलांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
लक्षणे-
अंगावर लाल पुरळ येणे, ताप येणे, स्नायू व सांधे दुखणे, डोके दुखणे हे सर्व लक्षणे आहे.
या वर कोणतेही उपचार नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. या विषाणूची लागण लागल्यावर पुरेशी विश्रांती घेणे, सतत पाणी पिणे, आवश्यक असल्याचे तज्ञ सांगतात.
भरपूर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि विश्रांती घेतल्याने शरीराला ऊर्जा मिळते. याची लागण झाल्यास लक्षणे व उपचार याबाबत जागरूकता असणे गरजेचे आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे